Pune City News
पुणे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ससून रुग्णालयाला भेट

TOPE

ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे सांगून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी येथील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

यावेळी आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला,

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.

Related posts

पुण्यातून १५३ विशेष रेल्वेगाड्या रवाना !

Vishal Khandagale

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

Vishal Khandagale

पुणे शहर पोलिसांचा माणुसकीचा “डिजिटल पास”

Vishal Khandagale

Leave a Comment