Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहर युवक कॉग्रेसचे “अन्नछत्र” होणार सुरु !

पुणे शहर :- कोरोनाच्या संकट काळात  नागरिकांना अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अन्न,औषध तसेच इतर गरजेच्या वस्तूंचा तुटवडा किंवा असुविधा यांच्यामुळे रुग्ण आणि रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक त्रस्त आहेत. अशाच कर्तव्य म्हणून  युवक काँग्रेसच्या वतीने पुणे शहर व जिल्ह्यात  “अन्नछत्र” सुरू करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

या मोहिमेद्वारे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या गरजेनुसार मोफत जेवण पुरविले जाणार आहे. उद्या दिनांक 6 मे पासून पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने या स्तुत्य व समाजपयोगी उपक्रमाची पुणे शहरातून सुरुवात होत आहे.
पुणे शहर युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी कृपया या उपक्रमाची माहिती अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

Related posts

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद!

Vishal Khandagale

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने घातले वाढत्या महागाईचे श्राद्ध !

Vishal Khandagale

पुणे मेट्रोवर होणारा खर्च थांबवून ; पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर खर्च करा!

Vishal Khandagale

Leave a Comment