Pune City News
पुणेमहाराष्ट्र

पुण्याच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून सारंग पाटील यांची माघार…

PUNE CITY NEWS :- पुण्यातील पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे राष्ट्रवादी चे प्रबळ दावेदार असणारे सारंग पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. अशी माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

सारंग पाटील हे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेक इच्छुकांनी आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सारंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातारा लोकसभा मतदार संघातील कामांसाठी पूर्ण वेळ देणार असल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीकडून सारंग पाटील यांच्यासह अरुण लाड, माणिक पाटील, श्रीमंत कोकाटे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत होती. त्यातील सारंग पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांनीच माघार घेतल्याने आता इतर असणाऱ्या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ही निवडणूक पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Related posts

रंगाचा बेरंग करणाऱ्या १,४३३ घेतले ताब्यात!

Vishal Khandagale

अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख

Vishal Khandagale

..तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील

Vishal Khandagale

Leave a Comment