Pune City News
पुणे

शहरात “रोटी डे” उत्साहात साजरा

माणुसकी व आपुलकीच्या उद्देशाने ‘एक घास.. भुकेलेल्यां साठी ! या ब्रीदवाक्यासह हा उपक्रम भुकेलेल्यासाठी ‘रोटी डे’ म्हणून साजरा केला. १ मार्च रोजी शहरात  उत्साहात “रोटी डे” साजरा करण्यात आला.  डेक्कन येथील नदी नदीपात्र व परिसरातील गरीब व गरजू लोकांना ज्ञानश्री फाउंडेशनच्या वतीने यावेळी १०० पेक्षा जास्त गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे हे उपस्थित होते.
या प्रसंगी ज्ञानश्री फाउंडेशनचे प्रमुख जोहरभाई चुनावाला, पुनम पाटील, अमर काळे, विश्वनाथ भुजबळ, अजय करंदीकर, राजेंद्र दीक्षित असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिजवलेले अन्न फिरस्ते, गरजूंना वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाची प्रसार न होण्यासाठी योग्य खबरदारी घेऊन हा रोटी डे साजरा केला.

Related posts

मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी : प्रकाश जावडेकर

Vishal Khandagale

करधारकांना बँकांचे अर्थ सहाय्य मिळवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक

Vishal Khandagale

पुण्यात तातडीने तीन जम्बो रुग्णालये उभारावी; अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment