Pune City News
गुन्हे विषयक

पुण्यातील सहकारनगर परिसरात चप्पल व्यावसायिकाची आत्महत्या

PUNE CITY NEWS :- पुण्यात एका मागोमाग एक आत्महत्या होताना दिसत आहेत.  एका नेपाळी जोडप्याने आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच सहकारनगर मधील एका चप्पल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शुभम राजेंद्र बोबडे (वय २३, रा. नवजीवन सोसायटी, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, शुभम बोबडे यांचे तुळशीबाग येथे चप्पलचे दुकान आहे. हे शुभम शनिवारी( दि.२०)रोजी त्याच्या आत्याकडे गेला होता. त्यावेळी त्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या आत्याने सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या केलेल्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

Related posts

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

पोलीस नाईक संजय बनसोडे यांची आत्महत्या !

Vishal Khandagale

अल्पवयीन मुलाचा बंदुकीत गोळ्या भरतानाचा व्हिडीओ व्हायरल !

Vishal Khandagale

Leave a Comment