Pune City News
गुन्हे विषयक

मंडप व्यासायिकाची गळफास घेऊन आत्महत्या…..

PUNE CITY NEWS :- पुण्यात आत्महत्येचे सत्र वाढताना पाहायला मिळत आहे. सकाळी सुखसागर नगर परिसरात एका कुटुंबाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ती घटना समजतेना समजते तोच धायरीमधील रायकर मळ्यामधील एका मंडप व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

तणावातून त्याने आपले जीवन संपवले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्वप्निल उत्तम रायकर (वय ४५ रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. घरची परिस्थिती देखील चांगली आहे.

त्यांना दोन मुल आहेत. काही दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये होते.त्यातूनच त्यांनी आज ( शुक्रवारी) सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्या डिप्रेशनचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. घटनेची माहिती त्यांच्या भावाने पोलिसांना दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts

शिरूर परिसरातून चार सराईत गुंडांना अटक; चार पिस्तुले हस्तगत

Vishal Khandagale

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

Vishal Khandagale

पोलिसांनी केला ७ किलो गांजा जप्त !

Vishal Khandagale

Leave a Comment