पुणे

पुण्यात “COVID-19 Test Bus” दाखल !

Pune City News:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढला असताना. कंटेन्मेंट क्षेत्रातील नागरिकांची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यासाठी, पुणे महापालिकेने क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर प्रा.लि. पुणे यांचेकडून सर्व प्रकारच्या सुविधा असलेली वातानुकूलित लॅब बस तयार करून घेतले आहे. या लॅबमध्ये एक्स-रे मशीन, स्वॅब कलेक्शन, पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर रुग्णाचा निदान होण्यास मदत होणार आहे. आज या वातानुकूलित लॅब बसचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी उपाध्यक्ष अनिल साळुंखे, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ अंजली साबणे, डॉ वैशाली जाधव, पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वातानुकूलित लॅब बसद्वारे बाधीत क्षेत्रात सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अजून एक चांगली अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा कोरोना विरुद्धच्या लढ्यात राबविण्यात येणार आहे. त्याबद्दल पालिकेचे व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचे समस्त पुणेकरांकडून महापौरांनी मनःपूर्वक आभार मानले..

Related posts

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

येरवडा पोलीस ठाणे व पेपल सेमनरी कडून गरजू व गरीब नागरिकांना किराणा वाटप!

Vishal Khandagale

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX