Pune City News
महाराष्ट्र

सप्टेंबरमध्ये होणार विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं. त्याची तारीख आता निश्चित झाली आहे.

कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह 7 आणि 8 सप्टेंबरला हे अधिवेशन पार पडणार आहे.

सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

अधिवेशना अगोदर एक दिवस म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.

प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सचिवांना सभागृहात प्रवेश मिळणार नाही. मात्र, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर चर्चेदरम्यान अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके घेण्यात येणार आहेत.

Related posts

क्रेडाई पुणे मेट्रो घेणार मजुरांची जबाबदारी – अनिल फरांदे

Vishal Khandagale

सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

संत तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे देहूनगरीत भजन आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment