Pune City News
गुन्हे विषयकपुणे

पोलीस कोठडीतील आरोपीला सफरचंद, उपमा देणाऱ्या चार पोलिसांवर कारवाई

पोलिस कोठडीत असणाऱ्या आरोपींना नाश्त्यामध्ये सफरचंद व उपमा देणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आली. खुनाच्या गुन्ह्यात लॉकअपमध्ये असणाऱ्या कायद्यांच्या सुरक्षेसाठी या चार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.

पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी यासंदर्भात दंडात्मक कारवाई चे आदेश दिले आहेत.

सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर दिगंबर खत्री, पोलिस हवालदार सुभाष जगताप, सदाशिव शंकर गुजले आणि मारूती गेंगजे अशी शिक्षा दंडात्मक सुनाविलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी गणेश कु-हे याला अटक करण्यात आली होती. त्याला 10 ऑक्टोंबर रोजी त्याला बंडगार्डन येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. रात्री नऊ ते सकाळी नऊ या दरम्यान खत्री, जगपात, गुजले व गेंगजे हे पोलिस कोठडीच्या बंदोबस्तावर तैनात होते.
दुस-या दिवशी झोन दोनच्या उपायुक्तांनी बंडगार्डन पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी पोलिस कोठडीतील रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी खुनातील आरोपी  उपमा व सफरचंद खात असल्याचे दिसून आले.
न्यायालयाकडून आरोपीला खासगी नष्टा देण्याचा कोणताही आदेश नव्हता. त्याशिवाय वरिष्ठ अधिका-यांचे लेखी अथवा तोंडी असे कोणतेही आदेश नव्हते. तरीही आरोपी लॉकअप मध्ये खासगी ठिकाणाहून आणलेला नाष्टा खाताना दिसून आला. कोठडीमधील आरोपींच्या हालचालीवर बारीक्ष लक्ष ठेण्याची चार पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, तसे न करता ड्युटीवर चार कर्मचा-यांनी घटनेबाबत कोणीही माहिती वरिष्ठांना दिली नाही.
हा प्रकार सीसीटीव्हीतून उघड झाला. त्यामुळे कर्तव्यामध्ये मोठी कसूर केली म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. दोन वर्षे वेतनवाढ का रोखू नये, अशी विचारणा केली होती. यावेळी चौघांनी उपायुक्तांकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर चौघांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली.

Related posts

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा सुरू!

Vishal Khandagale

पुणे स्टेशन व ताडिवाला रोड “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

महापालिकेची गणेशोत्सवासंदर्भात तयारीचा आढावा बैठक

Vishal Khandagale

Leave a Comment