Pune City News
खडकवासलागुन्हे विषयकपुणे शहर

धक्कादायक प्रकार; गोळीबार करत १४ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

पुणे शहर :-  वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने सांगून गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला.

गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एका आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत १५ दिवसांपूर्वी झालेला हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या १४ वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यातील ५ जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला पॅडी याने वाढदिवसाच्या न्रिमित्ताने १५ दिवसांपूर्वी वारजे माळवाडी येथील एसआरए बिल्डिंगमधील श्रीकांत काळे याच्या रुमवर नेले होते. तिथे कृष्णा ओव्हाळ व पॅडी यांनी फिर्यादीवर बलात्कार केला.

त्यानंतर निरंजन व दशरथ या मित्रांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहे, असे सांगून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तिने न ऐकल्याने पोटमाळ्यावर असलेल्या पिस्तुलातून त्याने फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने तिच्या छातीजवळ असलेल्या मोबाईलवर ही गोळी लागल्याने तिला किरकोळ जखम झाली.

तेव्हा कृष्णा याने पॅडीकडून चुकून हा प्रकार घडला आहे. याबाबत तू कोणाला सांगितले तर तुला खरोखरच मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर ही मुलगी घरी आली. आपण पडल्याने लागल्याचे तिने घरी सांगितले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.

दरम्यान, श्रीकांत राजेंद्र काळे (वय २३, रा. वारजे माळवाडी) हा धनकवडी स्मशानभूमीजवळ थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला २७ मार्च रोजी पकडले.

त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व ३ काडतुसे जप्त केली. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करत असताना जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याची चौकशी करीत असताना हा प्रकार समोर आला आहे.

श्रीकांत काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Related posts

येरवड्यात किरकोळ वादातून खून

Vishal Khandagale

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

Vishal Khandagale

कर्वेनगर परिसरात पत्नीला मारून ज्येष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या !

Vishal Khandagale

Leave a Comment