Pune City News
पिपरी चिंचवड

महापालिका ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग अयशस्वी

PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे.

त्यासाठी व्हॉटसअप, यू ट्युब, शैक्षणिक अ‍ॅपव्दारे ऑनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले आहे. मात्र, हा ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग हा अयशस्वी होताना दिसत आहे.

कारण ऑनलाईन शिक्षण घेण्यामध्ये विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने दरवर्षीप्रमाणे शाळा न भरविता ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शहरातील खासगी शाळांमध्ये हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, महापालिकेने ऑनलाईन शिक्षणासाठी केलेला दावा व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.

ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना एक वेबसाईट देण्यात आली आहे. त्यावर इयत्तेनुसार अभ्यासक्रम डाऊनलोड केलेला आहे.

काही शिक्षकांकडून दिक्षा अ‍ॅप व्हिडीओच्या लिंक, ऑनलाईन टेस्ट आणि त्यावर फीडबॅक याची वर्ड फाईल बनवून ती वेबसाईडवर अपलोड केली जाणार आहे.

त्याची लिंक शिक्षक ग्रुपवर सेंड करणार. विद्यार्थी त्या लिंक वरुन व्हिडीओ पाहतील आणि त्यावरुन टेस्ट सोडवून फिडबॅक देतील असे पालिकेच्या शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

मात्र, विद्यार्थ्यांना अद्याप कोणतीही लिंक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.

तसेच बहुतांश शिक्षकांनाही ऑनलाईन शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण दिले नसल्यामुळे शिक्षकांपुढेही ऑनलाईन कसे शिकवावे हे आव्हान आहे.

याबाबत बोलताना प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या की, व्हॉट्सपवर आपण अभ्यासक्रम देत आहेत. त्यासाठी दिक्षा अ‍ॅप???

Related posts

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

कोरोना: राज्यात रुग्णांत वाढ !

Vishal Khandagale

दोघांना अटक: 2 काडतुसे, 2 पिस्टल जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment