Pune City News
Uncategorizedपुणे

महापालिका विषय समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

पुणे महागरपालिकेची विषय समितीची निवडणूक आज( बुधवारी) पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळाले. कारण या समित्यांमध्ये सर्व भाजपच्याच उमेदवारांची निवड झाली आहे.

आज स.११ पासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. दु. साधारण ३.४५ पर्यंत ही निवडणुकीची प्रक्रिया चालली. या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत भाजपला ८, महाविकास आघाडीला ५ मते मिळाली. त्यामुळे भाजप ८, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ आणि शिवसेना १ अशी मते मिळाली आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या शहर सुधार समिती अध्यक्षपदी प्रसन्न जगताप, उपाध्यक्षपदी शीतल सावंत, क्रीडा समिती अध्यक्षपदी विरसेन जगताप, उपाध्यक्षपदी छाया मारणे, महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी माधुरी सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्षपदी वृषाली चौधरी, विधी समिती अध्यक्षपदी मनीषा लडकत, उपाध्यक्षपदी मनीषा कदम यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

Related posts

महापौरांनी केले “फिरते विसर्जन हौद” चे उदघाटन……..

Vishal Khandagale

पुणे महापौरांचा अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याच्या निर्णयाला विरोध !

नगररोड–वडगावशेरीत उमेदवारी दाखल

Vishal Khandagale

Leave a Comment