पुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील दिल्लीत अडकलेले यूपीएससीचे 325 विद्यार्थी पुण्यात पोहोचले,

PUNE CITY NEWS :- महाराष्ट्रातील यूपीएससीच्या तयारी चे विध्यार्थान साठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे 3:10 वाजता पोहोचली. त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. COVID -19 संदर्भात संशयित आढळले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले.तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले

Related posts

ब्रेकिंग! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार

Vishal Khandagale

पुण्यात पहिल्या खाजगी डॉक्टरचा मृत्यू !

Vishal Khandagale

राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत करावी -महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX