Pune City News
मनोरंजनराष्ट्रीय

मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार

निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला किंचित ब्रेक लागला होता. मात्र आता निसर्ग चक्रीवादळ शमले असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.

यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की… :
मान्सूनने मंगळवारी बंगालच्या उपसागरातील काही ठिकाणांहून आगेकूच केली आहे. त्यानुसार 10 अथवा 11 जून रोजी मान्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होईल़

त्यानंतर 14 किंवा 15 जूनपर्यंत वेगाने वाटचाल करीत तो संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे़ पुणे जिल्ह्यात 12 किंवा 13 जून, मुंबईत 13 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे़

सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात 12 जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल. त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल.

Related posts

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

‘जनता कर्फ्यू’ कोण बाहेर येऊ शकते, कोण नाही !

Vishal Khandagale

“इज्जतीत घरी रहा” हे गाणे “झी म्युझिक” वर प्रदर्शित

Vishal Khandagale

Leave a Comment