Uncategorized

वाहनधारकांना दिलासा; घेतला ‘हा’ निर्णय!

PCN

मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील अनेक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र आता तीच मुदतवाढ 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे.

आदेश : याविषयीचे आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. अशांसाठी हा आदेश दिला आहे.

दिलासा : ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUC सारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 30 जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे.

देशव्यापी लॉकडाउनमुळे वैधता संपलेल्या कागदपत्रांच्या नुतनीकरणासाठी अडचणी येत असल्याने हा आदेश दिला आहे. लॉकडाउनुळे मंत्रालयाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

Related posts

पुण्याला केंद्राकडून मिळणार १०० व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ

Vishal Khandagale

सावित्रीबाई फुले ( पुणे ) विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू

Vishal Khandagale

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX