Pune City News
पिपरी चिंचवड

शहर अभियंता ‘तुपे’ यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारली !

Pune City News:- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे विद्युत विभागाचे सह-शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी दिलेला अर्ज प्रशासनाकडून नाकारण्यात आला आहे.

सध्या तुपे यांच्या अनुभवाची प्रशासनाला अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारण्यात आली आहे. तुपे यांनी यापुढील काळातील निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम कोरोनाच्या जनजागृतीसाठी त्यांनी दिली आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी संतोष पाटील आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. असे असताना आता पुन्हा तिसरे अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड ही प्रतिनियुक्तीवरील आले आहेत. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी, निर्माण झाली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे प्रवीण तुपे यांनी 14 जानेवारी 2020 रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र प्रशासनांकडून तुपे यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारली आहे.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

जिल्ह्यात २ लाख ६ हजार ५१४ रुग्णांची कोरोनावर मात

Vishal Khandagale

पिंपरीत भीषण अपघात !

Vishal Khandagale

Leave a Comment