PUNE CITY NEWS:– पुणे महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. अतुल बेनके, आ. राहूल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रमकुमार,
सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

