Pune City News
राष्ट्रीय

अखेर भारतात कोरोनावर प्रभावी औषध उपलब्ध

कोरोनावर प्रभावी ठरणारे फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झाले आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने याविषयी दावा केला आहे.

मंजुरी : या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध देता येऊ शकते. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणले आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन व वितरणाला मंजुरी दिली आहे.

‘हे’ पहिलेच औषध : भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेतर्फे या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती दिल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. कोरोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे.

किंमत : औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे या कंपनीने सांगितले.

विशेष : औषधाच्या एका गोळीची किंमत 103 रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे रोज दोन डोस घ्यायचे आहेत.

Related posts

केरळ मधून मुंबईत डॉक्टर, नर्सची विशेष टीम

Vishal Khandagale

किराणा दुकान ONLINE ; शॉपमॅटिकचा पुढाकार

Vishal Khandagale

कोरोना : जागतिक बँकेकडून “भारताला” निधी मंजूर!

Vishal Khandagale

Leave a Comment