Pune City News
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्मांकडून अत्याचाराची तक्रार मागे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यांच्यावर  अत्याचाराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील अत्याचाराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले.

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलासा केला होता.

पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळले होते.

दरम्यान, रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती.

आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना याप्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

Related posts

इंदू मिलवरुन राजकारण नकोय…!

Vishal Khandagale

केंद्राने जाहीर केली महाराष्ट्रातील झोननुसार यादी !

राज्यात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला…राज्य सरकारची घोषणा

Vishal Khandagale

Leave a Comment