Pune City News
पुणे

हॉटेल, रेस्टॉरंट बार सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने सुरू

pmc

पुणे- प्रतिनिधी :- राज्य‌ शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत महापलिकेनेही शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी येत्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश गुरुवारी( दि.१) रोजी रात्री काढले आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

■ शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस दिनांक ३१ ऑक्टोबर अखेर बंद राहतील.

■ सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, सर्व प्रकारचे सभागृह आणि तत्सम जागा
■ सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन, तत्मम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील, अशा प्रकारचे कार्यक्रम
■ सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलनेपुणे

नव्याने सुरु…

■ हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार दि. ०५/१० पासून ५०% क्षमतेनुसार किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार सुरु राहील.

■ यासाठी पर्यटन विभागाकडून SOP निर्गमित करण्यात येईल. या कार्यप्रणालीनुसार कामकाज बंधनकारक असेल.

सार्वजनिक सभा, संमेलने यांना बंदी कायम असून, लग्न समारंभासाठी ५० आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी राहणार आहे.

दरम्यान शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह आदी शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा; आरोग्यमंत्री

Vishal Khandagale

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शहरात उपचार सुरू

Vishal Khandagale

कात्रज “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment