Pune City News
राष्ट्रीय

राज्यसभा : गोगोईंनी घेतली शपथ!

माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज (दि.19) राज्यसभेचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी विरोधी पक्षांनी गदारोळ केला. गोगोई यांच्या शपथेच्या निषेधार्थ कॉग्रेसच्या खासदारांनी सभात्यागही केला.
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आज शपथ घेण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी दाखल होताच विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.देशाचे 46 वे सरन्यायाधीश गोगोई यांच्या शपथविधी दरम्यान काँग्रेसचे खासदार निेषेध नोंदवत सभागृहातून बाहेर पडले. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षातील खासदारांच्या या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली.

Related posts

पुणे शहरात भारतातील प्रथम मोबाइल सॅनीटायजेशन युनीट व्हँन

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब

Vishal Khandagale

बाजारात मोदी मास्क; नागरिकांकडून भन्नाट प्रतिसाद !

Vishal Khandagale

Leave a Comment