Pune City News
राष्ट्रीय

कोरोना; आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवासी विमानांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
येत्या 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत. तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.भारतात कोरोनाचा शिरकाव परदेशातूनच झाला, त्यामुळे मोदी सरकारने उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी घरून काम करण्याची विनंतीही सरकारने केली आहे.तसेच विद्यार्थी, रूग्ण आणि दिव्यांग प्रवर्ग वगळता रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक सर्व सवलतीच्या प्रवासाला स्थगिती देण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर, विस्तारा एअरलाईन्सने 23 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत.

Related posts

सीमेवर मोठा तणाव : लष्करप्रमुख लेह दौऱ्यावर

Vishal Khandagale

कुख्यात डॉन दाऊद इब्राहम पाकिस्तानमध्येच

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सकाळी 9 वाजता ‘स्पेशल मेसेज’

Vishal Khandagale

Leave a Comment