Pune City News
राष्ट्रीय

रेल्वेकडून 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द….

Pune City News:- रेल्वेनं 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. तिकीटं रद्द करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वेकडून तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत. मात्र, मजुरांसाठी चालवण्यात येत असलेल्या विशेष गाड्या सुरूच राहतील. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत.रेल्वे 22 मे पासून मेल, एक्स्प्रेस आणि शताब्दी गाड्या सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या देशभरात अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

यानुसार शताब्दी विशेष आणि इंटरसिटी विशेष गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल.
या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लासची 20 तिकिटं वेटिंगवर असतील. तर एसी सेकंड क्लासमध्ये 50 आणि एसी थर्ड क्लासमध्ये 100 तिकिटं वेटिंगवर असतील. स्लीपर क्लासमध्ये 200 तिकिटं वेटिंगवर असतील.

Related posts

नक्षलवाद्यांनी जवानांची बस भूसुरुंग स्फोटाने उडवली, 5 जवान शहीद

Vishal Khandagale

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment