महाराष्ट्र

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु: मंत्री अँड. अनिल परब

Pune City News:- राज्यात शासनाच्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता इतर विभागामध्ये अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि.22 मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार आहे.राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु करण्याबाबतची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.

◆अटीशर्तींच्या◆

▪️ 23 मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे.

▪️ राज्यशासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला जिल्ह्या-अंतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

▪️ जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात, त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

? *काय आहेत अटी व शर्तीं?* :

▪️ जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत हि बस सेवा सुरु राहील.

▪️ प्रवासासाठीच्या बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.

▪️ बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

▪️ जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही.

▪️ प्रवास सुरु करताना प्रत्येकाने सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.

▪️ प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

वरील अटी व शर्तींचे पालन करून प्रवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री, अॅड. अनिल परब यांनी केले आहे.

Related posts

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

गोवा राज्य सरकारचा “पर्यटन बंद” चा निर्णय

Vishal Khandagale

भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX