Pune City News
गुन्हे विषयकहडपसर

रेमडेसिविर चा काळाबाजार करणारा गजाआड

कोरोना विषाणू बधीतांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर या इन्जेक्शनचा बेकायदेशीररीत्या बाळगून त्याचा काळाबाजार करून ती चढ्या किमतीत विकणाऱ्या औषध विक्रेत्याला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

अंकित विनोद सोलंकी (वय२६, रा. सुखबानी कॉम्प्लेक्स, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. २१) कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांना अंकित सोलंकी नावाचा व्यक्‍ती कोंढवा येथील जायका हॉटेलजवळ कोरोना रूणांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये तपास पथकातील अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलिस अंमलदार यांचे पथक तयार करून बनावट ग्राहक तयार करून सोलंकीकडे रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी पाठविले.

तेथे गेल्यानंतर बनावट ग्राहक म्हणून गेलेल्या अंमलदाराला जायका हॉटेलच्या आडबाजूला नेऊन त्याला दोन इंजेक्शन दाखवून एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच एका इंजेक्शनसाठी दहा हजार रोख स्वरूपात स्वीकारून १० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात मागणी करीत असताना त्याला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनबाबत तपास केला असता त्याने ते इंजेक्शन हे डॉक्टरांनी ज्या रुणाला आवश्यकता आहे, त्यांना दिलेले प्रिस्क्रौप्शन चोरी केली. त्यानंतर ससून येथील एका मेडिकल स्टोअर्समधून खरेदी केले असल्याचे सांगितले. तसेच ते इंजेक्शन चढ्या भावामध्ये काळाबाजाराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

दरम्यान, त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्‍त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सोलंकीला अटक करून गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकिलांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related posts

कोरोना संशयिताची आत्महत्या

Vishal Khandagale

पीएमपीएमएल बंदला भाजपचा विरोध

Vishal Khandagale

पुणे शहरात आज ५३९५ पॉझिटिव्ह रुग्ण; ४३२१ रुग्णांना डिस्चार्ज.

Vishal Khandagale

Leave a Comment