Pune City News:- पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील पुलाखाली आज ( सोमवारी) कामगारांची मोठी गर्दी केली होती. ही वाढलेली गर्दी पाहून पोलिसांना याठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या ठिकाणी कामगारांचा अड्डा असल्याने अनेक परराज्यातील कामगार उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील कामगार या परिसरात कामासाठी दाखल झालेले आहेत. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन आल्याने सर्वजण याठिकाणी अडकून पडले. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला.
पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असल्याने परप्रांतीय मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आपापल्या राज्यात जायला मिळावे, यासाठी हे मजूर एकत्र आले. वारजे पुलाखाली मजूरअड्डा भरत असतो. त्याच ठिकाणी गर्दी होत असल्याने बहुधा आपल्याला गावी जायला मिळणार, ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.त्यामुळे येथे जवळपास १००० मजूर एकत्र जमले होते. परिस्थिती होताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना सौम्य लाठीमार करून कामगारांना पांगवण्यात आले.

