Pune City News
Uncategorized

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल चे निलंबन !

NCP BANDAL

पुण्यातील एका सराफाकडे 50 कोटी रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पुणे पोलिस चौकशी करत आहेत. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आहे. याच प्रकरणी पक्षाने त्यांचं निलंबन केलेलं आहे. तशी घोषणा पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.
खंडणी प्रकरणी प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
कालच पोलिसांनी मंगलदास बांदल यांचा जबाल नोंदवला होता. पोलिस पुढचं पाऊल काय उचलणार यासंबंधी उत्सुकता असतानाच पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
खंडणीखोरांना या आधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार तसंच एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकारावर बांदल यांची बाजू आणखी समोर येऊ शकलेली नाहीये.

Related posts

“MED ON GO” प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

अल्पवयीन तरुणाने केली एकतर्फी प्रेमातून हत्या

Vishal Khandagale

शिक्रापूर येथे ४१लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment