महाराष्ट्र

आंतरजिल्हा एसटीची सेवा सुरू; ई पासची गरज नाही

PUNE CITY NEWS :- कोरोना संक्रमणामुळे मागील ५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती. ती आज २० ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय घेतला असून एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

तसेच गणेशोत्सव काळात लोकांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी हा निर्णय घेतला. एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

काळजी : काही नियम पाळून प्रवास करता येईल, एका एसटीत २२ जण प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांनी याची काळजी घ्यावी. जशी मागणी येईल तशा बसेस वाढवल्या जातील. तसेच एसटीचे दर पूर्वीप्रमाणे राहतील त्यात कोणतेही बदल होणार नाहीत ही महत्वाची माहिती देखील परब यांनी यावेळी दिली.

Related posts

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

आमदार सुनील टिंगरे कोरोना पॉझिटिव्ह

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX