Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा; जिल्‍हाधिकारी

राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे.

औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्‍याचा इशारा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्‍त सुरेश पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related posts

कोरोना : इन्फोसिस च्या कर्मचारयाला कोरोना ची लागण

Vishal Khandagale

आंदेकर टोळीच्या संघर्षात युवकाचा खून

Vishal Khandagale

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

Vishal Khandagale

Leave a Comment