पुणे शहर :- ससून रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने पळून जाण्याच्या उद्देशाने रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दीप्ती सरोज असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा प्रकारच्या अनेक गुन्हयात या महिलेला पोलिसांनी अटक केली होती.
यानंतर तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या या महिला आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिचा आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

