कोरोनापुणे

शिरूर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

शिरूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यातील ११ गावांमध्ये १५ हुन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

शिरूर शहरातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. आजपर्यंत शिरूर शहरामध्ये १९३ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११९३ इतकी झाली आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाने एक हजारांचा टप्पा ओलांडल्याचे पहायला मिळत आहे. मात्र याला आळा घालण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. नागरिक कोणत्याही शासकीय नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे रुग्ण वाढीला पाठबळ मिळत आहे.

सद्य स्थितीत शिरूर तालुक्यातील केंदूर १, पिंपळे जगताप १,कारेगाव १,शिरूर ग्रामीण १, टाकळीहाजी १,वढू बुद्रुक २,शिक्रापूर १, तळेगाव ढमढेरे १, धामारी ३, शिरूर शहर ४, कोरेगाव भीमा १ असे शिरूर तालुक्यातील ११ गावात पंधरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.

Related posts

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने मानाच्या तीन गणपतींना प्रथेप्रमाणे मानाचे ………

Vishal Khandagale

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणावर भर : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गातील १६०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX