Pune City News
पुणे

भिमा कोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा : राहुल डंबाळे

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही, सभांना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे समजले असून दरवर्षी अत्यंत उत्सवाने, प्रचंड गर्दीने साजरा होणारा १ जानेवारी भिमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यानी राज्यातील व देशभरातील आंबेडकरी अनुयायांना केले आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी डंबाळे म्हणाले की, कोरोनाचा देशामधील प्रादुर्भाव पुणे परिसरात असून आज रोजी पुणे परिसरात तब्बल १४ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे.

त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारचे गर्दीने साजरे होणारे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये जेजुरी, आळंदी व इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. भिम अनुयायांनी भिमजयंत्ती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिर्वाणदिन चैत्यभूमी प्रमाणे आंबेडकरी अनुयायांनी भिमाकोरेगाव लढ्यातील शुरविराना अभिवादन करुन भिमाकोरेगाव येथे येण्याये टाळावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Related posts

मा.नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त “अन्न धान्य किटचे” वाटप !

Vishal Khandagale

कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन

Vishal Khandagale

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: डॉ.दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment