Pune City News
राष्ट्रीय

118 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया

भारत सरकारने बुधवारी चीनला पुन्हा एकदा दणका देताना पबजीसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यावर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

प्रतिक्रिया : चीनने भारताच्या कारवाईचा विरोध केला असून “मोबाइल अ‍ॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार व सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे”, असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

“चीन या मुद्द्यावर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी”, असंही वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग म्हणाले.

बंदी : बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या सुरक्षा व सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने पबजी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली.

आतापर्यंत एकूण 224 चिनी अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत.

Related posts

30 मार्चऐवजी 30 जूनला संपणार आर्थिक वर्ष; आरबीआयचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

देशात भरात 1.90 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

Vishal Khandagale

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन !

Vishal Khandagale

Leave a Comment