पुणे

हडपसर औद्योगिक वसाहत मधील कचरा डेपोला भीषण आग

हडपसर भागातील रामटेकडी येथे असणाऱ्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली होती.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले.यात जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे. कचरा प्रकल्प असून, या कचरा प्रकल्पाला रात्री ८;४५  वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती नागरिकांनी दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या ११ फायर गाड्या पाठवण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आग अद्याप देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली जात आहे.

Related posts

भिडे फुलाजवळ मगर दिसल्याची अफवा

Vishal Khandagale

फिनस्विमिंग’ क्रीडा स्पर्धा आयोजनास सहकार्य करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

10 वी आणि 12 चा निकाल अद्याप नाही

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.