Pune City News
पुणे

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

पुण्यातील वारजे परिसरात स्थानिक नगरसेवक सचिन दोडके व पुणे महानगरपालिका  यांच्या पुढाकारातून ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनवारण करण्यात आले.

पुणे शहरामध्ये आता ४५ मीटर आणि त्या उंचीचा असणारा हा तिसरा राष्ट्रध्वज स्तंभ तयार करण्यात आला आहे. या अगोदर शनिवार वाडा येथे असाच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे कात्रज येथे देखील स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकारातून भव्यदिव्य राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला. त्यामुळे आता हा पुण्यातला तिसरा भव्यदिव्य राष्ट्रध्वज स्तंभ आहे.

यावेळी शहर पवार म्हणाले की, ज्यावेळेस खडकवासला मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्या वेळेस या मतदारसंघाने वेळोवेळी आपल्याला खंबीरपणे साथ दिल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

तेव्हाच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत मोठा बदल झाला असून हा परिसर आयटी इंडस्ट्रीमुळे पूर्णपणे बदलला आहे. पुण्याबाहेरून आणि राज्याबाहेरून लोक या परिसरामध्ये राहायला आले आहेत. त्यामुळे पूर्वीचा हा परिसर आता ओळखला जात नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

Related posts

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

Vishal Khandagale

पुणे शहरातील आज दिवस भरातील कोरोना विषयी माहिती

Vishal Khandagale

Leave a Comment