Pune City News
पुणे

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

हर्षवर्धन जाधव

हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होती. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. बचाव पक्षाचे वकील झहिर खान पठाण यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणींतर याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली.

सध्या हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातील महिला आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. परंतु गुरूवारी त्यांना अंतरिम जामिन मिळवून दिला आहे. त्यामुळे त्या फरारी नसून याच ठिकाणी आहेत, असंही पठाण यांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांची पोलीस कोठडी पूर्ण झाली.

Related posts

पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत

Vishal Khandagale

दुसऱ्या मजल्यावरून गतीमंद मुलीला खाली फेकलं !

Vishal Khandagale

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त: जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment