Pune City News :- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क घालून फिरावे अशी सूचना दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा जाणवत आहे.
तर अंधेरी, वांद्रे, भिवंडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मास्कसाठा जप्त केला आहे. मुंबईच्या क्राईम ब्राँच युनिट 9 ने ही कारवाई केली आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे ही घटनास्थळी उपस्थित होते.
मुंबई क्राईम ब्रांचला काही दिवसांपूर्वी मास्कचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचने आज वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश देसाई यांनी वांद्रे, अंधेरी, भिवंडी या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. पोलिसांनी गिऱ्हाईक बनून मास्कची होलसेल मागणी केली. या आयडियाद्वारे तब्बल 14 कोटींचा मास्कसाठा जप्त करण्यात आला.
यावेळी चार आरोपींना अटक केली असून उर्वरीत दोघांना लवकरच अटक करु, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

