कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत.
केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे.
त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे.
सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या.
त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.

