जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे.
- भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.
- ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं.
- ब्लॅकहोल शोधला : तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला.
- गौरव : त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे. त्यामुळंच त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
- पुरस्कारांची घोषणा : या तिघांनाही 11 लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममधून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

