Pune City News :- कोरोना विषाणू या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आव्हान महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच देशभरातील जनतेने आज जनता कर्फ्यू पाळत घराबाहेर न पडण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला.
रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक असून खंडाळा घाट परिसर देखील मोकळा पहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगांनी गजबजणारे टोल नाके आज मात्र रिकामे-रिकामे पहायला मिळत आहेत.
next post

