Pune City News
पुणे शहरवडगावशेरी

राहुल शिरसाठ यांच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना राशन कीट वाटप !

पुणे शहर :- स्व.राजीव गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत , पुणे शहर युवक कॉंग्रेस चे कार्याध्यक्ष राहुल शिरसाठ व माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ यांच्या वतीने वडगावशेरी मतदार संघ परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना एक महिना पुरेल असे राशन कीट देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आयोजक राहुल शिरसाठ व राजेंद्र शिरसाठ यांचे आभार मानले.

यावेळी माजी गृहमंत्री रमेश बागवे, नारायण गलांडे, रमेश सकट तसेच  बाबा नायडू, सचिन सुडगे, वाहिद नीलगर, अभिजीत साळवे, निखिल चौरे, किरण पाटोळे, गणेश खरंगुळे, निशांत शिरसाट, फय्याज शेख, राजू लोखंडे, श्याम जाधव, सागर सदामते, सुमित लांडगे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल शिरसाठ राहुल शिरसाठ राहुल शिरसाठ

यावेळी राहुल शिरसाट यांनी  “पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी वेळोवेळी अडचणीतल्या प्रत्येक माता-भगिनींना अशा प्रकारची मदत नियमित पुरवली जाईल आणि हेच आमचे कर्तव्य आहे”… असे मत यावेळी व्यक्त केले.

Related posts

पुणे शहरात ४२०६ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale