Pune City News
कोरोनापुणे शहर

भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

पुणे शहर :- केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ मे पासून १८ वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी लसीकरण मोहिमेचे दोन टप्पे पूर्ण करण्यात आलेले आहेत.

यादरम्यान ४५ वर्षे वयाच्या नागरिकांना लसीकरण होत होते. यात अनेकांना लसीचा पहिलाच डोस मिळाला आहे आणि दुसरा दोन अजून मिळणे बाकी आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. १ मे यात नवीन संख्येची भर पडणार आहे.

त्यामुळे येत्याकाळात लसीकरण मोहिमेला गती देणे आणि लसीकरण सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी आज पुणे शहर भाजपतर्फे सूचनांचे पत्र पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना दिले.

लसीकरण मोहिमेसाठी आराखडा जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रसंगी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार माधुरीताई मिसाळ,भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, उपमहापौर सुनिता वाडेकर,सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

Related posts

राज्यात पुन्हा LOCKDOWN पुन्हा वाढवला !

Vishal Khandagale

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा…

Vishal Khandagale

Leave a Comment