Pune City News
कोथरूडकोरोनापुणे शहर

करोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांचे आरोग्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे गिरीश खत्री यांच्या वतीने आयोजन..

पुणे शहर :- भारतीय जनता पार्टी पुणे शहर  व  गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने करोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांचे आरोग्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तान्ह्या बाळापासुन ते किशोरवयीन मुलांची प्रतिकारक्षमता वाढवण्याचे प्रभावी उपाय या विषयावर बालरोग तज्ञ डॉ.संजय मानकर यांनी सहभागी नागरिकांना मार्गदर्शन केले. The Third Wave Of Corona And The Health Of Young Children

या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी  भविष्यातं गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये . ह्याकरता खबरदारी व संक्रमणापासुन वाचण्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरेल असे सांगत या वोईस मेसेज च्या मार्फत  उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर  मोहोळ म्हणाले की,  मागील वर्षापासून आजपर्यंत,आपण सर्वजण करोनाच्या वैश्विक संकटाशी लढत आहोत. भारतात भविष्य काळात करोनाची तिसरी लाट ही तन्ह्या बाळांपासुन ते किशोरवयीन मुलांवर अधिक गंभीर परिणाम करणारी ठरणारं आहे, असे तज्ञांचे मत आहे. त्यावर आपण उपाययोजना करत आहोत. कोरोनाची तिसरी लाट व लहान मुलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन म्हणून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. गिरीश खत्री सातत्याने नागरिकांची काळजी घेण्यासाठी झटत आहेत त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमास , राजेंद्र येडे , चंद्रकांत पवार , पराग गायकवाड , अनंत सुतार , शंतनु खिलारे पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन गिरीश खत्री आणि मित्र परिवाराने केले.

Related posts

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

नागरीकांसाठी धार्मिक स्थळे बंद

Vishal Khandagale

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज!

Vishal Khandagale