Pune City News
महाराष्ट्र

रिपब्लिकन जनशक्तीचा केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध !

आझाद मैदान, मुंबई येथे रिपब्लिकन जनशक्ती आंदोलनाच्या माध्यमातून विविध पक्ष संघटनांनी सहभाग घेऊन NRC,CAA,NPR, महाराष्ट्रात लागू होऊ नये तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करुन मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच या कायद्याचा आझाद मैदान येथे सर्वांनी आपल्या भाषणात निषेध नोंदवला. या आंदोलनाचे आयोजन जेष्ठ साहित्यक, आंबेडकरी चळवळीचे विचारवंत आणि रिपब्लिकन जनशक्ती पक्षाध्यक्ष मा अर्जुनराव डांगळे साहेब व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोजभाई संसारे यांनी केले होते. या आंदोलनात रिपब्लिकन जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे हे असंख्ये कार्यकर्ते यांच्या समवेत सहभागी झाले होते.या मध्ये विविध मुस्लिम संघटना, ख्रिस्ती संघटना, संभाजी ब्रिगेड,विविध रिपब्लिकन पक्षाचे गट,तसेच महिला संघटनाचे प्रमुख सहभागी झाले होते.

Related posts

आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ

Vishal Khandagale

प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्याकोऱ्या वेब सिरीज

Vishal Khandagale

‘शिवसेनेला फसवले ही चूक झाली’ – मुनगंटीवार

Vishal Khandagale

Leave a Comment