Pune City News
Uncategorizedपिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

दुबई पर्यटन करून आलेल्या दोन पुणेकरांना कोरोना ची लक्षणे

पुणे शहरात दुबईहुन परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली असून दोघांवरही आपल्या पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांचं पथक दोघांच्याही तब्बेतीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.
हे दाम्पत्या दुबईला पर्यटनासाठी गेले होते.मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले.मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधे पोहचले. त्यानंतर त्यांची सॅंपल्स टेस्टिंगसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती आणि दुबईमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं तोपर्यंत दिसून आलेलं नव्हतं.त्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या चाळीस जणांबरोबर दुबईला गेले होते त्यापैकी कोणाच्याच टेस्ट करण्यात आल्या नाहीत असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना अवहान केले आहे, घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका. एखाद्या माहितीची सत्यता आणि खातरजमा केल्याशिवाय पुढे पाठवू नका

Related posts

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने महिलेची फसवणूक !

Vishal Khandagale

राष्ट्रीय महामार्गांवर उद्यापासून टोलवसुली!

Vishal Khandagale

संकेत स्थळावरुन होणार विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन

Vishal Khandagale

Leave a Comment