Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना; राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय

Pune city News:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आणखी कठोर पावले टाकली आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अनुशंगाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

विशेषत: मुंबईतील गर्दीबाबत काही ठोस पावले टाकण्यात आली आहेत. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे.गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच ते शक्य होईल. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
सरकारने केले मोठे बदल :
1)राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील.
2)रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्याच्या सूचना.
3) मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येणार.
4)दुकानांच्या वेळा ठरविणार :शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.
5)साधनसामुग्रीची उपलब्धता : दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत.आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे.

Related posts

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Vishal Khandagale

“श्रीं” ची प्राणप्रतिष्ठापणा प्रथमच अध्यक्ष, पदाधिकारी करणार

Vishal Khandagale

कोरोना विषाणू ग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये विभागणी !

Vishal Khandagale

Leave a Comment