Pune City News
राष्ट्रीय

मुला-मुलींमध्ये फरक करु नका : निर्भयाचे वडील

Pune City News:- न्यायासाठी संघर्ष खूप करावा लागला. या न्यायासाठी ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिले, त्या सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली. मुला-मुलींमध्ये फरक नको आहे. वडील म्हणून प्रत्येकाने मुलींबाबतचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. न्याय घेताना त्यात अनेक पळवाटा आहे. परंतु लढा प्रामाणिक असल्यास त्याला न्याय मिळतो. आम्ही सत्य होतो, त्यामुळे न्याय मिळाला.
न्यायासाठी कायद्याचा प्रत्येक दरवाजा ठोठावला. दोन्ही बाजूने कायद्याचा धुराळा उडाला. पण, शेवटी न्याय मिळाला. समाजातील नराधमांना
या फाशीमुळे चांगलाच धडा मिळाला आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या फाशीमुळे देशभर आनंद आहे. अनेक ठिकाणी होळी साजरी केली जात आहे. ही न्यायाची होळी आहे, असेही निर्भयाच्या वडील म्हणाले.

Related posts

मोदींची घोषणा : रोजगारनिर्मितीसाठी 50 हजार कोटी

Vishal Khandagale

अदर पुनावाला सीईओ सिरम इन्स्टिट्यूटचे यांनी घेतली कोरोनाची लस

Vishal Khandagale

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट आज जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment