Pune City News:- जगातील पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी पाळण्यात आला आहे. एकूण 50 देशांत हा दिवस साजरा केला जातो. त्याबद्दल जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी.
कधीकाळी चिमणीच्या चिवचिवाटाने होणारी सकाळ आता फक्त एक आठवण राहिल्याचे दिसून येत आहे. शहरीकरणामुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला असून, महानगरांमध्ये दिसणारी सामान्य चिमणी दुर्मिळ होत आहे.
आपण आरोग्यदायी पर्यावरण, हरित पर्यावरणासाठी त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा निर्धार करून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास मदत करावी.
रान चिमणी ही प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळत असून. नाशिकमधील जंगल भागांमध्ये आढळते. या चिमणीची संख्या कमी होत असून जंगलांमध्ये चिमण्यांची गिलवरीने शिकार केली जाते. चिमण्यांची अन्न म्हणूनही वापर करतात.
नर चिमणीदेखील आढळून येथे या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असून, तिच्या गळ्या व डोळ्याजवळ काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भरलेली असते.
त्याचप्रमाणे, मादी चिमणी भुरकट व राखाडी रंगाची असून, या चिमणीचा विणीचा हंगाम बाराही महिने सुरु असतो. ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा पाहायला मिळतो.
जंगलातील चिमण्यांच्या होणाऱ्या शिकारींमुळे या चिमण्या कमी आढळत आहेत. शिकारी न करण्यासाठी वन विभागाच्या ग्रामीण भागात काही संस्था आणि सोसायटींची जनजागृती मागील 8-10 वर्षांपासून सुरु आहे.

