Pune City News:- करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बँकांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.यानुसार राज्यातील सर्व बँका सकाळी दहा ते दुपारी दोन याच वेळेत कार्यरत राहतील. या कालावधीत फक्त अत्यावश्यक व तातडीचे बँकिंग व्यवहारच करता येतील. तसेच एका वेळी फक्त पाचच खातेदारांना बँकेत प्रवेश दिला जाईल.घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार शासनातर्फे पुढील आदेश येईपर्यंत बँका कार्यरत राहतील. बँकेच्या शाखेत किती कर्मचारी असावेत, याचा निर्णय संबंधित बँक व शाखाधिकारी घेतील. व किमान आवश्यक कर्मचारी संख्येतच बँका चालविण्यात येतील. बँकेचे कर्मचारी आळीपाळीने कामावर येतील. रस्त्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एका वेळी बँकेच्या एका शाखेत फक्त पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. उर्वरित ग्राहकांना बँकेबाहेर एकमेकांपासून किमान एक मीटर अंतर ठेवून रांगेत उभे राहावे लागेल. रांगेनुसार त्यांना आत प्रवेश दिला जाईल. या संदर्भातील आवाहन बँकेच्या शाखांबाहेर लावण्यात येईल. गरज भासल्यास क्लस्टर पद्धतीने शाखा चालविण्यात येतील. त्याचा निर्णय संबंधित बँक व्यवस्थापन घेईल.
previous post

