Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

‘राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल’

“लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला सर्कस बोलणार्‍या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे हे ‘अनुभवाचे बोल’ आहेत,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी रिंगमास्टरच्या चाबूकाने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर मलिक यांनी असा पलटवार केला आहे.

मलिक म्हणाले : “महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे आयएमसीआरने मुंबई मॉडेलची स्तुती केली आहे. मात्र, असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथसिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत आहेत.

राजनाथ सिंग काय म्हणाले? :
“महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी खरपूस टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. कोरोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नसल्याचेही राजनाथ सिंग यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रे असतानाही असे घडत आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे,” असेही ते म्हणाले.

“आम्ही कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करत आहोत. तरीही या सरकारला कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आले नाही ही बाब दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही, असेही ते म्हणाले.

Related posts

सलग 12 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Vishal Khandagale

आधार अपडेट करणे झाले खर्चिक

Vishal Khandagale

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’; जगातील पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र

Vishal Khandagale

Leave a Comment